Bollywood Special आणि गाण्याची कहानी
लेखक:सुरेश बोर्ले
महान कलाकार हे नेहमीच महान कामे करतात. अनेक क्षेत्रात अशा माणसांनी आपली छाप सोडलेली आहे.हेच महान कार्य स्व.मोहम्मद रफी साहेबांनी संगीत क्षेत्रात आणि खास करून,हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत केलेलं आहे.भारतात कुठेही वाढदिवस साजरे करताना,बार बार दिन ये आये!बार बार दिलं ये गाये! हे अजरामर गाणे गायले वाजवले जाते. त्याशिवाय तो कार्यक्रम पुर्ण होत नाही.श्रावणात नारळी पौर्णिमा रक्षा बंधन संपले की लगेचच गोकुळाष्टमी येते व दहीकाला येतो.त्यादिवशी गोविंदा आलारे आला!जरा मटकी संभाल ब्रिजबाला!ह्या गाण्याने नाक्या नाक्यावर दही हंडीची सुरुवात होते आणि आपण जातो मग त्या कृष्ण धवल फिल्मी दुनियेत.ह्या गाण्याची थोडक्यात हकीकत अशी आहे!१९६३ साली”ब्लफ् मास्टर” म्हणजे थापड्यांचा राजा असा अर्थ होतो हा सिनेमा आला.तो काळ हिंदी फिल्मी जगताचा सुवर्ण काळ होता.ह्या चित्रपटासाठी थापाड्याचे काम शोभेल अशा स्व.शम्मी कपूर ह्या अवलिया नटाची निवड केली होती,ते निर्माता दिग्दर्शक स्व.सुभाष देसाई ह्यांनी.या चित्रपटातील गोविंदा गीताचं संगीत दिलेल आहेत!ते कल्यानजी आनंदजी ह्यांनी. वास्तविक ही जोडी गिरगावच्या मंगलवाडी धूम्मा हाऊस येथे वास्तव्यास होती.तर त्यांचे वडील स्व.विरजीभाई ह्यांचे ठाकूरद्वारला बनयाचे दुकान होते.नाहीतरी गिरगाव ही दही हंडी उत्सवाचे माहेरघरच आहे. प्रत्येक गोविंदा हा त्यांच्या दारावरनच जायचा.हा उत्सव त्यांनी जवळून पाहिलेला होता.तर निर्माता दिग्दर्शक
स्व.मनमोहन देसाई हे सुद्धा
गिरगावच्या खेतवाडीतले.
थोडक्यात ते पण गिरगावकरच होते.हे गाण चित्रित करण्यापूर्वी ते कोणत्या अंदाजाने चित्रित झाले पाहिजे? हे सगळ संगीत दिग्दर्शकानसहित एका बैठकीत ठरले.मग गीतकार
स्व.मजरुह सुलतानपूरी ह्यांच्याशी बोलणी झाल्यावर, त्यांनी मराठी चालीचे गोविंदा आलारे आला! हा संदर्भ पकडून हे अजरामर गाणे तयार केलं. तर शम्मी कपूर हे त्याकाळचे खरोखर ब्लफ् मास्टर होते.त्यानी ह्या गाण्याला स्थानिक गोविंदा पथका सोबत नाचून गिरगावच्या रस्त्यावर, ओल्या अंगाने स्वतःला झोकून देत धिंगाणा घालत!ह्या गीताला चारचांद लावले.त्याकाळातील सुरेख संगीताला साथ लाभली ती
महान गायक स्व.मोहम्मद रफी साहेबांची.ह्या गाण्याचे चित्रीकरण गिरगावातील मंगल वाडी,फणस वाडी,आणि मुगभाट परिसरात झाले.तर ही हंडीअशोक स्टोअर ह्या पतंगाच्या दुकाना समोरच्या चाळीत बांधली होती.६२ वर्षा पूर्वी आलेला हा चित्रपट,ह्या गाण्यामुळे बराच चालला.पण शम्मी कपूर ह्यांच्या बरोबर नाचणारी व थर लावणारी ही माणसे! ही खरोखर मंगलवाडी गोविंदा पथकातील होती. त्यातील माणसे आता हयात नसतील.जी पोरं असतील ती आता साठीपार असतील. कांहीं गोष्टी ह्या चित्रीकरणाच्या माध्यमातून लोकांच्या लक्ष्यात राहिल्या,त्या म्हणजे जुन्या गिरगावच्या चाळी स्व.शम्मी कपूर ह्यांच्या सोबत स्थानिक गोविंदा पथकाने केलेला नाच व गोविंदाचे लावलेले थर!तर निर्माते दिग्दर्शक व संगीतकारांनी हे गोविंदा गीत प्रथमच हिंदी सिनेमात आणलं.तर त्यांच्या बरोबर स्व.रफी साहेबांनी गिरगावचा हा गोविंदा हा भारतभर व जगभर नेला.त्याला तोड नाही.
Wahhh
Omg