
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : चारकोप येथील रयत शिक्षण संस्थेचे, प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालयामध्ये यंदाचा भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने
कार्यक्रमाची सुरुवात सह्याद्रीनगर परिसरात आयोजित केलेल्या प्रभातफेरीने झाली. यामध्ये ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ध्वजारोहण आणि खास परंपरा
प्रभातफेरीनंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. शाळेची खास परंपरा जपून, यंदाच्या वर्षी एस.एस.सी. परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या कुमारी सई अधिक कदम हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
विद्यार्थ्यांची भाषणे आणि कला सादर
ध्वजारोहणानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि नृत्यांचे सादरीकरण केले. यामध्ये अन्वी संतोष तळेकर, संस्कृती मनोहर भागवत, शिवांश सचिन ताईगडे, साई मंगेश परब, मनस्वी संतोष पडवळ आणि प्राजक्ता प्रबोध सलगर यांनी प्रभावी भाषणे दिली.
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिशु वर्गाच्या मुलांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित वीररसप्रधान समूह नृत्य सादर केले. तसेच, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. दक्ष सतीश दबडे याने देशभक्तीपर गीताचे सुंदर गायन सादर केले.
सई कदम यांचे प्रेरणादायी भाषण
प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेल्या कुमारी सई कदम हिने आपल्या भाषणात शाळेने तिच्या जीवनात बजावलेल्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, असे आवाहन तिने केले.
उपस्थितांचा सहभाग
या कार्यक्रमाला विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटीसह परिसरातील विविध संस्था व मंडळांचे प्रतिनिधी, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री मदन चव्हाण,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. यु. व्ही. जगताप, परिसरातील देशप्रेमी नागरिक, पालक, माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. एस. प्रबळकर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देणाऱ्यांचे आभार मानण्यात आले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
Swatantry divsachya hardik sadichha
Happiest independence dayyy
Omgg