
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : राष्ट्र सेवादल, मालाड च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणेकर हाऊस, प्रकाश आनंद भवन मालाड पश्चिमेत आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न. मागील ४३ वर्षांपासून राष्ट्र सेवादल, मालाड च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करत रक्त संकलन करून हजारो गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याला सार्थक करत राष्ट्र सेवादल, मालाड दर वर्षी अविरतपणे रक्तदान शिबिराचे यशसवी रीतीय आयोजन करत हजारो पिशव्या रक्त संकलन करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा केला आहे. या प्रसंगी रक्त संकलन केले. या साठी नरेंद्र मेस्त्री,सिद्राम बंडगर आणि मंगेश गुरव यांनी व त्यांच्या सहकार्यन्नी अहोरात्र मेहनत घेतली.जोरदार पाऊस असून ही उत्साही रक्तदाते आवर्जून रक्तदाना साठी उपस्थित राहिले त्यांचे आभार संघटने च्या वतीने करण्यात आले.तसेच पुढच्या वर्षी पण स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणार असल्याची माहिती सिद्राम बंडगर सर यांनी दिली.

स्तुत्य उपक्रम
Greatttt
Great great Public service