प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी २ नंबर येथील गटारे पावसाच्या पाण्याने तुंबली.साने गुरुजी लगत च्या गटाराची स्वच्छता निट होत नसल्याने पावसाच्या पाण्या ने गटारे तुंबली व घाण पाणी पूर्ण रस्त्यावर साचल्याने नागरिकांना येथून ये जा घाण पाण्यातून करावी लागते तसेच लगतच खासगी रुग्णाल्या असल्याने रुग्णांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून शिव अंगण इमारत तसेच सनराईझ इमारतीतील रहिवाशांना तसेच आजू बाजू च्या परिसरातील नागरिकांना या घाण पाण्यातूनच ये जा करने भाग पडत आहे.या बाबत पालिकेत अनेक लोकांनी माहिती देऊन ही पालिका पी उत्तर विभागातील अधिकारी व कर्मचारी देखावयाची सफाई करून निघून जातात. जर यातील संपूर्ण गाळ उपसले त्र पाण्याचा निचरा निट आणि व्यवस्थित होईल मात्र तसं होत नसल्याने थोडं जरी पावून पडले तर पाणी साचते तसेच या घाण पाणी मूळे दुर्गंधी चा प्रचंड त्रास होतो तसेच मच्छरांची संख्या ही वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. स्थानिकांनी गटारातील गाळ उपसण्याची आणि धूर फवारणी औषध फवारणीची मागणी केली आहे.
Malwani’s gutter situation is literally pathetic