
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अंधेरी कोर्ट बार असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा वकिलांसाठी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी अंधेरी कोर्ट बार असोसिएशनचे सचिव कुणाल फुले यांनी परिश्रम घेत राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या स्पर्धेत अंधेरी कोर्ट बार असोसिएशन, दादर कोर्ट बार असोसिएशन, कुर्ला कोर्ट बार असोसिएशन, उच्च न्यायालय नागपूर बार असोसिएशन, ठाणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशन, पुणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशन, वांद्रे कोर्ट बार असोसिएशन, बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट बार असोसिएशन, नवी मुंबई जिल्हा न्यायालय बार असोसिएशन, मालेगाव जिल्हा न्यायालय बार असोसिएशन, माझगाव कोर्ट बार असोसिएशन, मुलुंड कोर्ट बार असोसिएशन, कल्याण जिल्हा न्यायालय बार असोसिएशन, बोरिवली कोर्ट बार असोसिएशन, विक्रोळी कोर्ट बार असोसिएशन, मुंबई उच्च न्यायालय, कर्जत बार असोसिएशन, बॉम्बे बार असोसिएशन हायकोर्ट, एएआयडब्ल्यू हायकोर्ट, या सर्व राज्यातील विविध बार असोसिएशनच्या वतीने कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेसाठी उस्फुर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत बुद्धिबळ स्पर्धा अंतिम फेरी मध्ये पुणे बार असोसिएशन (ओंकार परदेशी) विरुद्ध किल्ला कोर्ट असोसिएशन (नितीन कांबळे) यांच्यात झाली. यामध्ये पुणे बारने बुद्धिबळ फायनल जिंकली. तसेच दुहेरी कॅरम अंतिम सामना अंधेरी कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई यांच्यात रंगला. यामध्ये अंधेरी कोर्ट बार असोसिएशने बाजी मारली. एकेरी कॅरम स्पर्धेत सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई विरुद्ध कल्याण कोर्ट बार सोसिएशनचे यांच्यामध्ये एकेरी सामना पार पडला, यामध्ये सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई विजयी झाले. या स्पर्धेत विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Good initiative