
मुंबई: : जुलै – ऑगस्ट मध्ये वॉर्ड क्रमांक ४९ , पालिका पी उत्तर प्रशासकीय वॉर्ड मालाड मध्ये पाणी विभाग, एस.डब्ल्यू.एम (घन कचरा व्यवस्थापन विभाग), आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, देखभाल विभाग यांच्यासह सामाजिक लेखापरीक्षण अहवालाबाबत गोलमेज परिषद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मालवणी आबोजवाडीमध्ये सोशल ऑडिट पाणी, स्वच्छता ( सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन, गटार आणि फरशी),आरोग्य, शिक्षण, महिला आणि बाल सुरक्षा या विषयांवर करण्यात आले. वस्तीतील रस्ते, गटर लाईन, कचरा व्यवस्थापन, लादिकरण , सार्वजनिक शौचालय, हरित जागा आणि शिक्षण, आरोग्य याबद्दल मोहल्ला प्रतिनिधींनी या बैठकीत सोशल ऑडिट आणि व्हल्नरेबिलिटी असेसमेंट रिपोर्ट अधिकाऱ्यांसमोर सादर केला. बस्ती प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चांगली चर्चा केली आणि समस्येवर काम करण्यासाठी सभेचे इतिवृत्त (मिनिट्स) लिखित दिले. पी उत्तर विभागात डिपार्टमेंट नुसार अधिकाऱ्यांसोबत युवा संस्था, मोहल्ला कमिटी, बाल अधिकार संघर्ष संघटन,मालवणी युवा परिषद प्रतिनिधी उपस्थित होते.
छान
RTC gd
Good