शिवाजी शिक्षण संस्थेत रंगला मंगळागौर कार्यक्रम…

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई : घाटकोपरच्या पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मराठी सण, संस्कृती व परंपरा जपण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद फाटक व संस्थेचे इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहकार्याने अनेक उपक्रम दरवर्षी शाळेमध्ये आयोजित केले जातात.सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा आज दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम मंगळागौरची पूजा उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी केली. त्यानंतर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील अनेक मुलींनी पारंपारिक पध्दतीने साड्या नेसून, अंगावर अनेक दागिने परिधान करून तसेच मंगळागौर साठी लागणा-या कळश्या, सुपल्या, लाटण्या इ. साहित्याचा वापर करून मंगळागौरच्या गाण्यांवर पारंपारिक पद्धतीने नृत्य सादर केले. यावेळी या मुलींनी “पर्यावरणाचे रक्षण करा”, “मुलगी शिकली प्रगती झाली” तसेच “स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्या” असे संदेश नृत्यातून दिले. हा उत्सव विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र बडवे व समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते.श्रीम. राजश्री ढवाण, श्रीम. वीणा नाईक व इतर शिक्षिका यांनी मंगळागौर नृत्याचे दिग्दर्शन केले


Share

One thought on “शिवाजी शिक्षण संस्थेत रंगला मंगळागौर कार्यक्रम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *