
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मालाड, ता. २४(बातमीदार )मंत्रालय येथे दिनांक २२ ऑगस्ट रोजी सेबी द्वारे योग्य गुंतवणूक करण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी व जोखीम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, सद्य परिस्थितीत अनेक लोकांचा मेहनतीचा पैसा कसा गुंतवणूक करावा याची योग्य माहिती नसल्यामुळे एका क्षणात धोकाधडी करून फसवणूक झाल्याचे अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत असतो, धोका होणार नाही यासाठी आपण कोणती काळजी व जबाबदारी घेतली पाहिजे तसेच योग्य गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी यावर माहिती राहुल केळापूर, सहाय्यक महाव्यवस्थापक – सेबी (AGM-SEBI) व संदीप कृपलानी महा व्यवस्थापक -सेबी (SEB)I यांनी दिली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच मंत्रालय मुंबई येथे पार पडला, हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंत्रालय मुंबई येथील कर्मचारी संघटना याचे अध्यक्ष रविन्द्र मंजुळे व सर्व कार्यकारी सदस्य तसेच सदर प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच मंत्रालय मुंबई येथे घेण्यात येण्यासाठी प्रदीप के मून, माजी उपसंचालक, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार तसेच सेबी स्मार्ट, भरत दावे सहाय्यक महाव्यवस्थापक बीएसई (BSE) , मनोज नाहक सेबी स्मार्ट यांनी प्रयत्न केले.
असे प्रशिक्षण सामान्य लोकांसाठी सुद्धा करले जावे