
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : शिवसेना शाखा क्रमांक ५४ च्या वतीने विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या मागदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, शाखा प्रमुख अजित भोगले यांच्या पुढाकाराने नुकतेच संपूर्ण गोरेगाव विभागात जवळपास एक हजार कुटुंबियांना गणेशोत्सवानिमित्त गणेश पूजन साहित्य वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले.दरवर्षी गणपतीत ज्यांच्या घरी बाप्पाचे आगमन होते त्यांच्या घरी अशा अर्थपूर्ण साहित्य देण्याची परंपरा आमची शाखा जपत असते असे भोगले यांनी सांगितले.साहित्य घरपोच मिळाल्याने गणेशभक्त देखील खुश होते.
Gd