प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई :वकिलांचा मंत्रालयातील प्रवेश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री यांना वकील सुभाष पगारे यांचे पत्र लिहून मागणी केली. विधीमंडळ, कार्यकारी (कार्यपालिका), न्यायपालिका व प्रसारमाध्यमे हे चार लोकशाही चे स्तंभ आहेत. राज्याच्या मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत “डीजी प्रवेश” (Digi Pravesh) हे अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे व त्यावर नोंदणी करून अभ्यंगताना मंत्रालयात प्रवेश दिला जात आहे. सदर प्रवेश निश्चित करण्यासाठी अप्लिकेशन मधे मंत्रालयात भेट देण्याचे वेगवेगळे प्रकार नमूद केले गेले आहेत. त्यामध्ये पत्रकार, दिव्यांगण व इतर लोकांना
भेट देण्याचे प्रकार नमूद आहेत. यामध्ये प्रेस अर्थात प्रसारमाध्यमांची मंत्रालयाने वेळ ही सकाळी ११ वाजता प्रवेशासाठी ठेवली आहे.
लोकशाही च्या मुख्य आधारस्तंभात असलेल्या न्यायपालिकेत वकील हे “कोर्ट ऑफिसर” म्हणून न्यायालयात जनतेची बाजू मांडत असतात, जनतेचे काही प्रश्न हे शासनाच्या निगडित देखील असतात, त्यामुळे वकिलांना देखील मंत्रालयात यावे लागते पण वकिलांची प्रवेश वेळ ही सर्वसामान्य जनतेप्रमाणे दुपारी २ ची ठरवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचा विधी व न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग यांची महत्वाची कार्यालये मंत्रालयाच्या इरमारतीत आहेत. आपण स्वतः एक विधी शाखेचे पदवीधर आहात. न्यायपालिकेतील महत्त्वाचा घटक म्हणून वकिलांची मंत्रालयीन प्रवेश वेळ बदलून किमान प्रसारमाध्यमांप्रमाणे सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात यावी असे विनंती चे पत्रउच्च न्यायल्याचे वकील सुभाष पगारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे.
Need to rethink
हो बरोबरआहे