शिकलगार प्रीमियर लीग उत्साहात संपन्न….

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : कुर्ला येथे शिकलगार जमात ट्रस्टच्या वतीने शिकलगार प्रीमियर लीग  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिकलगार प्रिमीयर लिगचे उद्घाटन अशरफ, शिकलगार, नौशाद शिकलगार, शमा शिकलगार, सलीम शिकलगार यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.

यात क्रिकेटमधील उत्कृष्ट कौशल्य आणि सामुदायिक भावनेचे आकर्षक खेळाचे प्रदर्शन झाले. यात टिम प्रहार, टिम कुर्ला, शिकलगार मल्ला, शिकलगार पतपेढी स्टाफ, टिम महाराष्ट्र, टिम रायझिंग स्टार, व्हाब्रंट डायरेक्टर्स, टिम दस्तगीर या ८ संघानी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा खूप रोमांचक क्षणांनी, आकर्षक वैयक्तिक कामगिरीने भारलेली होती. शेवटी तीव्र चुरशीने झालेल्या फायनल मध्ये मुंबईच्या टीम प्रहार नेअतितटी च्या सामन्यात प्रथम स्थान पटकावले तर कुर्ला टिमने उपविजेतेपद पटकावले. दोन्ही संघाने खिलाडूवृत्ती, आणि खेळातील प्रतिभा सिद्ध केली. संपूर्ण लीगमध्ये सर्वच खेळाडूंची गुणवत्ता व चमकदार कामगिरी दिसून आली. या स्पर्धेत अमनभाईने मालिकावीर तर सादिकभाईने सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला. गोलंदाजीमध्ये नईमभाई सर्वोत्कृष्ट ठरले. तर या स्पर्धेत पंच म्हणून नदीम शिकलगार, मोहसीन शिकलगार, अजीम शिकलगार, शरीफ शिकलगार आदींनी भुमिका पार पाडली. क्रिकेट लिगमध्ये कॉमेट्री सादिक शिकलगार, मोसिन शिकलगार, आलम शिकलगार, विपिनकुमार तिवारी यांनी सादर केली. ही स्पर्धा एकता, उत्सव आणि समुदायाच्या खेळांमधील उत्कृष्ट आविष्कार होता.उत्साही सहभाग आणि प्रफुल्लित वातावरणामुळे शिकलगार प्रीमियर लीग क्रिकेटचा खरा महोत्सव व जल्लोष बनला होता. शिकलगार जमात ट्रस्टचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि अथक प्रयत्नांमुळे हे उल्लेखनीय उपक्रम व नियोजन शक्य झाले. अशा स्पर्धेमुळे तरुण प्रतिभेला प्रेरणा मिळाली आणि समुदायातील संबंध अधिक घट्ट झाले. ही क्रिकेट लीग त्या खेळभावनेचे एक उत्तम उदाहरण होते. या स्पर्धेतील सर्व, प्रसंग, घटना व क्षण रोमांचक व संस्मरणीय होते.


Share

5 thoughts on “शिकलगार प्रीमियर लीग उत्साहात संपन्न….

  1. Shikalgar jamat trust mumbai over the past 21years under the able Guidance of Naushad Yakub shikalgar has been actively involve in the betterment of Society •Due to his Approach, perseverance ,dedication vast transformation has taken place regards Education and Organisation of Shikalgar premiere league was a stepping stone towards Sports for shikalgars as Naushadbhai believes in the over all development of shikalgars
    A good initiative appreciated by all shikalgars it created a bonding among families

  2. शिकलगार समाज्याच्या प्रगतीसाठी आपण जे काम करत आहात ते उल्लेखनीय आहे त्यामुळे
    आपल्या शिकलगार समाज्यात नवचैतन्य येईल असेच नवनवीन उपक्रम राबवावेत व आपला समाज प्रगती पथावर जावा हीच सदिछया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *