मराठा आरक्षणाची लढाई आरपार करण्याच्या तयारीत जरांगे पाटील !

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : कांहीं तासातच मराठा आरक्षण पुढारी
मा.जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून पुन्हा मुंबईकडे अंतरिम लढ्यासाठी,मोठ्या लव्याजम्यासह कूच करणार आहेत.मूळ मुद्दा आहे तो म्हणजे! मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं.त्यासोबत इतरही अटी आहेत.पाटील साहेबांनी आता ही लढाई आरपार लढायला हवी.कारण मराठा समाज हा एके काळी सुखी समृद्ध होता!सदन होता.त्यामुळे पूर्वज बढाजाव
पणातच राहिले.सदन असल्याने, त्यांना आरक्षणाची गरज त्याकाळी लागली नाही. ह्या समाजाची आज अशी बिकट परिस्थिती नव्हती.पण त्या काळी जर मराठा समाजाने आरक्षण ला हकार दिला असता तर आज ही परिस्थिती नसती.जेथे अत्याचार तेथे क्रांती हे समीकरण आहे.कारण मराठा समाजावर कधी अत्याचार झालाच नाही.मग क्रांती होईलच कशी?पण दिवस सारखे राहत नाहीत!ह्या समाजाचा बराच मोठा घटक आता दुर्बलतेकडे गेला आहे.त्यामुळे इतर जाती व धर्म हे सगळ्या बाबतीत अग्रेसर होत असताना मात्र. मराठा समाज हा घटनेच्या कायद्यांनी बऱ्याच अवंशी दुर्बल बनला आहे, हे सत्य आहे.ज्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरते त्याचं ठीक आहे.पण ज्यांना आता सुबतेची प्रगतीची आवश्यकता खरोखर आहे, त्यांच्यासाठीच हा खटाटोप आहे आणि ह्या आंदोलनचा जो मार्ग व विषय हा बरोबर आहे.कारण सरकारच्या मनात आरक्षण देणे घटनेनुसार अशक्य आहे. म्हणून सरकारची कुचंबणा होत आहे. म्हणून जरांगे साहेब!ह्या महाराष्ट्र सरकारला नव्हे!तर भारत सरकारला घटना दुरुस्ती करायला भाग पाडा.कारण इतर मागालेल्या समाजा प्रमाणे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ही आर्थिक दृष्ट्या प्रगतीची संधी मिळालीच पाहिजेल. ही लढाई अतिशय महत्वाची आहे. सकल मराठा समाजाने,आता कंबर कसून आरक्षण पदरात पडून घ्यावे.जरांगे साहेब!रोज मरे त्याला कोण रडे किंवा अती तेथे माती अशी अवस्था आपण करून घेऊ नका.खोट्या आश्वासनांना बळी पडू नका!मैदानात दटून रहा. संपूर्ण मंत्रालय आझाद मैदानात आले पाहिजे अशी कृती करा. मराठा मोर्चा हा शिस्तीचा असतो,मग सरकारनेही शिस्तीतीतच त्यांना आरक्षण द्यावे!ही समाजाची मागणी आहे.इतर जाती धर्माची लोक आंदोलने मोर्चे काढतात, तेव्हा खाजगी संपत्तीची तोडफोड करतात, सरकारच्या संपत्तीची नासधूस करतात, ती नष्ट करतात.पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही,अशा कृतीने कृतीची दखल लगेच सत्ता धारी घेतात. मराठा समाज लोकशाही मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत आहे त्यावर राज्य आणि केंद्र सरकार ने आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात असे मराठा समाजाची मागणी घेऊन जरांगे पाटील थेट मुंबईत येत आहेत……


Share

2 thoughts on “मराठा आरक्षणाची लढाई आरपार करण्याच्या तयारीत जरांगे पाटील !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *