प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : महापे ते शिळफाटा रस्त्यालगत, सर्वेक्षण क्रमांक २१८/ब मध्ये असलेल्या संरक्षित वनक्षेत्रात दरड कोसळली. या घटनेमुळे रस्त्यावर माती व दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच, वन विभागाचे वन परिमंडळ कार्यालय, कळवा येथील कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक व जवान, वन मजूर,स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शीळ गावातील नागरिकांच्या सहकार्याने आणि दोन जेसीबींच्या मदतीने रस्त्यावरील माती व दगड बाजूला करून महामार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.
Sad
Sad