
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाड पश्चिमेतील प्रसिद्ध समुद्र किनारा अकसा बीच वर अल्पवयीन मुलकात दुपारी बुडताना वाचवले. रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी, दुपारी २. २५ वाजताच्या सुमारास मालवणी गेट क्रमांक ७ आंबोजवाडी येथील रहिवासी १२ वर्षीय अब्दुल रहीम हा अकसा समुद्रात पोहायला गेला होता. मात्र समुद्री लाटात वाहून जात असताना दृष्टी कंपनी चे कर्तव्यदक्ष जीव रक्षक मन कमलाकर वैती यांनी अब्दुल रहीम या अल्पवयीन मुलाला खवळलेल्या समुद्री लाटातून वाचवून जीवन दान दिले. मन वैती या जिवरक्षकाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. अकसा समुद्र किनारा हा धोकादायक असून त्या ठिकाणी पालिकेने तशा सूचना फलक ही लावून पर्यटक दुर्लक्ष करत आल्याने अनेक पर्यटक येथे जीव गमावतात. तसेच जिवरक्षकांना ही आपला जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवण्याचे कर्तव्य पार पाडावे लागत आहे.
शब्बाश!!
Great to save human life