कबनूर येथील स्वामी समर्थ काॅलनीत लघुपट संवाद संपन्न..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

कबनूर : गणेशोत्सव म्हणजे गणरायाची प्रतिष्ठापना या पलिकडे जात एकत्र येण्याची संधी घेत कबनूर येथील स्वामी समर्थ काॅलनीवतीने लघुपट संवादासाठी संविधान परिवारचे कार्यकर्ता दामोदर कल्पना नागेश यांनी निमंत्रित केले होते. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की, गल्लीत गणेशमूर्ती नसली तरी मनोरंजनातून समाजप्रबोधनाचे काम ते करत आहेत.

काॅलनीतील मुलांनी पुष्प देऊन स्वागत केले. सत्कारानंतर ब्लूमिंग फ्लाॅवर्स, थॅंक गाॅड बाप्पा, वेक अप काॅल, सनफ्लाॅवर साॅंग, शिवरायांचे आठवावे रुप, लड्डू, थीफ आदि लघुपट दाखवून संवाद करण्यात आला. संवादक म्हणून संजय रेंदाळकर यांनी केले. त्यांचेसोबत तांत्रिक सहकार्य करणेसाठी संवेदना फेलोशिपचे दामोदर कल्पना नागेश उपस्थित होते.

कार्यक्रम आणि त्यातील चर्चा इतकी रंगत गेली की साधारण दोन तासाहून अधिक चालला. या कार्यक्रमात चर्चेत सहभागी होणारेंना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी महिला आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

2 thoughts on “कबनूर येथील स्वामी समर्थ काॅलनीत लघुपट संवाद संपन्न..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *