“द कपिल शर्मा शो”च्या प्रसारणाला बंदी घालण्या चा इशारा..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांनी मराठा आंदोलन सुरू असताना केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर माफी मागावी अन्यथा ‘द कपिल शर्मा शो’च्या मुंबईतील प्रसारणाला बंदी घालण्यात येईल  मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने कपिल शर्मा शो च्या व्यवस्थापकला पत्र लिहून इशारा. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.पत्रात म्हटले आहें कीसुमोना चक्रवर्ती

यांनी आपल्या पोस्टमध्ये मराठा समाजाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली आहे, ज्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाज नेहमीच शांततापूर्ण आंदोलनांवर विश्वास ठेवतो आणि सुमोना चक्रवर्ती यांनी केलेला आरोप पूर्णपणे निराधार आहे.

यामुळे, आम्ही ‘द कपिल शर्मा शो’ च्या व्यवस्थापनाकडे मागणी करतो की, सुमोना चक्रवर्ती यांनी त्यांच्या पोस्टबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी. जोपर्यंत त्या माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुंबईत ‘द कपिल शर्मा शो’ चे शूटिंग किंवा प्रसारण होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा. च्या वतीने देण्यात आला आहें.सकल मराठा समाज दिंडोशी गोरेगाव ने दिला आहें.अशी माहिती विलास सुद्रीकयांनी दिली आहें.


Share

2 thoughts on ““द कपिल शर्मा शो”च्या प्रसारणाला बंदी घालण्या चा इशारा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *