
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : मुंबई चौपाटीवर आज सकाळी जवळ जवळ बावीस तासाहून अधिक काळ चाललेल्या ह्या प्रतिष्ठित मुंबईच्या मंडळांच्या गणेश मूर्तीच शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन पार पडले.ह्या विसर्जनात लालबागच्या राजासहित,गणेश गल्लीचा विक्रमी “मुंबईचा राजा”, तेजुकाया मेनसन,रंगारी बदक चाळ,चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा,नरे पार्क, भायखळ्याचा राजा,गिरगावचा राजा आदी भव्य मंडळानच्या बाप्पांचा समावेश ह्यात आहे. करोडांच्या संख्येने भाविक आज दुसऱ्या दिवशीही त्याच उत्साहात सामील होते.तर ३६० च्या परिघाता फिरणारा नवीन लालबागच्या राज्याचा तराफा!हा विशेष लक्ष वेधून घेत होता.हा तराफा खास मंडळाने,बनवून घेतला आहे. विसर्जन करताना राजाची पाठ ही भक्तांकडे न राहता,त्याचे मुख दर्शन गणेश भक्तांना व्हावे! ही संकल्पना ह्यच्या मागची आहे. आहे.तर लालबागच्या राजातर्फे आनंद शेठ अंबानी ह्यांचे विशेष आभार हे फलक,लोकांचे लक्ष वेधून घेत होते.अतिशय भक्तिमय वातावरणात मुंबईचा गणेशोत्सव २०२५ हा पार पडला.
“गणपती बाप्पा! मोरया पुढच्यावर्षी लवकर या” ह्या गगनभेदी गरजनेसहित.
सर्व व्यवस्थित शांतातेत पर पडल्याचे समाधान!!