तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार….

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : शिक्षक दिनाच्या औचित्याने मालाड येथील अथर्व युनिव्हर्सिटी  मुंबई आयोजित भव्य कार्यक्रमात “आदर्श शिक्षक पुरस्कार२०२५” प्रदान करून गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

या विशेष प्रसंगी अभिनव विद्यामंदिर बोरीवली या शिक्षण संस्थे मध्ये कार्यरत असलेल्या तेजस्वी अनिल निवाते यांना मान्यवरांच्या उपस्थितीत “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, अथर्व युनिव्हर्सिटी चे कुलपती सुनील राणे, आमदार योगेश सागर  चारकोप  व समाजसेवक यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले होते आणि यामध्ये विविध शाळा व महाविद्यालयातील शिक्षक सहभाग घेतला.पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांनी आपल्या कार्यातील अनुभव आणि प्रेरणादायक प्रवास विषद करत उपस्थितांचे मन जिंकले.कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीही साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या शुभेच्छा मार्गदर्शन  करून झाला.पुरस्कार मिळाल्याने तेजस्वी यांचे अनेकांनी अभिनंदन केले.


Share

2 thoughts on “तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *