रडार हटवण्यासाठी महाआरती करत बाप्पाला निरोप.!!

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : दहिसर पूर्व भागातील विमान प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या रडार यंत्रणाहटवण्यासाठी स्थानिकांनी विसर्जना पूर्वी महा आरती करत आपला रोष व्यक्त केला. गेले काही वर्षापासून या क्षेत्रात जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा काम पूर्णपणे ठप्प झाले आहेत तर काही ठिकाणी अर्धवट रखडलेली आहे,  या क्षेत्राचा  आनंद नगरात वर्ष 1981 मध्ये निर्माण झालेल्या  72 ईमारती 43 वर्ष जुन्या झालेल्यांनी दिवसोंदिवस जीर्ण होत असून  त्यांना अनेक वेळी  डागडुजीवर खर्च करावे लागत आहे  या जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

मात्र पुनर्विकासा साठी कामात  रडार यंत्रणा  येथून हटवल्या  शिवाय ईमारतीच्या उंची वाढवणे अशक्य आहे, सद्यस्थितीत सरकारकडून या रडार यंत्रणा स्थालांतरित करण्याचा  निर्णय घेतले आहे परंतु प्रकिया संथगती ने चालू आहे त्यासाठी संतप्त झालेले सर्व सोसायटीच्या रहिवाश्यांनी सरकारकडे मागणी करत आनंद नगर उत्सव समिती द्वारे चतुर्दशी च्या दिवशी गणपतीची महाआरती करत संताप व्यक्त केला.. रडार  हटवल्या शिवाय इमारतीच्या पुन र्विकास होणार नाही असे सरकारी निर्णय अभावी  मालकीचे अधिकार असून राहत्या जुनीं ईमारतीचे रिडेव्हलपमेंट साठी रहिवाशी हतबल झाले आहेत. भविष्यात जुन्या इमारती पडून दुर्घटनाग्रस्त होण्याचा आधीच सरकारनें रहिवाश्यांची मागणीवरसहानुभूती पूर्वक विचार करण्याची फार गरज आहे .सरकारने लवकरच प्रश्न सोडवावे अन्यथा लोक हितासाठी जन आंदोलन करावे लागेल असे आरतीला जाहीर करण्यात आले,  या वेळी 43 वर्ष जुन्या आनंद नगर उत्सव समितीत सहभागी एकात्मता ने कामे करणारे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी  किरण चव्हाण, कर्णा अमीन, मनिष पारकर, सुहास धानुका, अशोक महेता,चंद्रहास मालवणकर, गिरीश सावंत व एड्वॉकेट सतीश शर्मा  सामाजिक कार्यकर्ता राजेश पंडया व स्थानिक रहिवाश्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून गणपती बाप्पाला निरोप दिला.


Share

One thought on “रडार हटवण्यासाठी महाआरती करत बाप्पाला निरोप.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *