एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले
“जब खैरात लगी बटने, तो लगा कलेजा फटने, तब उपरवाला याद आया!”
ही म्हण सध्या शिंदे गटाच्या एका आमदाराच्या भूमिकेला तंतोतंत लागू पडते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई :शिवसेना (शिंदे गट)च्या एका आमदाराने एमआयएम पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी विचित्र व घबराटीची मागणी केली आहे. यापूर्वी “५० खोके एकदम ओके” असा जनतेतून आरोप होत असताना, पैशांनी भरलेल्या बॅगसोबतचा फोटो व्हायरल झाल्याची पार्श्वभूमी असताना अशी मागणी करणे हास्यास्पद असल्याची टीका होत आहे.
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांत असून १५ जानेवारीला मतदान आहे. एमआयएम पक्षाचे निवडणूक चिन्ह पतंग असल्याने संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा उत्साह वाढेल व मतदानाचा टक्का वाढून संबंधित पक्ष फॉर्मात येऊ शकतो, अशी भीती शिंदे गटाच्या आमदाराला वाटत असल्याचा आरोप केला जात आहे.
यावर प्रतिक्रिया देताना एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी ही मागणी पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे स्पष्टपणे सांगितले. मकर संक्रांत हा भारतीयांचा सण असून त्या दिवशी पतंग उडवून सण साजरा करण्याची परंपरा आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचे आकर्षण असते. आचारसंहिता असली तरी तिचा पतंग उडवण्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांना “भारत रत्न” हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सत्कार करावा, अशी विडंबनात्मक मागणी एमआयएम नेत्यांनी केली आहे. तसेच त्या दिवशी मकर संक्रांतचा सण जोरदार पतंग उडवून साजरा करणार, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येक दलाच चिन्ह जे आहे ते या जगात रोज कुठेना कुठे दिसत जस कमल फुलाचा तलाव माणसाचा हाताचा पंजा दिल्लीत सतत जलणारी मशाल टि वी वर दाखवणारी मिलिका रामायण मधले धनुषय बाण भाले तलवार मग काय हे सर्व काय नष्ट करायचे खरा विजय तर तुम्ही जनते साठी कलेले समाजातले काम ठरवते चिन्ह नाही