BJP चा ‘मूक मोर्चा’V/S विरोधकांचा ‘सत्याचा मोर्चा’..

Share

एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले

मुंबई : राज्यातील मतदार यादीतील घोटाळ्याच्या विरोधात आज मुंबईत विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी तसेच इतर विरोधी पक्षांचा सहभाग असणार असून, मेट्रो परिसरातून मोर्चा मनपा मुख्यालयाकडे रवाना होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपनेही “मूक मोर्चा” काढण्याची घोषणा केली आहे. आमदार मंगल प्रभात लोढा व साठम यांच्या नेतृत्वाखाली बाबुलनाथ ते चर्चगेट या मार्गावर हा मोर्चा निघणार आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप बचावात्मक भूमिकेत गेल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर, मतदार यादी पारदर्शक ठेवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला असल्याचा भाजपचा दावा आहे.

राजकीय वर्तुळात दोन्ही मोर्चांमुळे आज मुंबई सह राज्याचे वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.


Share

4 thoughts on “BJP चा ‘मूक मोर्चा’V/S विरोधकांचा ‘सत्याचा मोर्चा’..

  1. राज कारण नको आहे जे सत्य आहे ते समजून घेउन त्यावर कारवाई करावी

  2. लोकशाहीत ‘ मतदार राजा ‘ असतो.हे खासकरून नालायक पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावे! सध्या सत्तेत असलेल्या
    ‘ फडणवीस ‘ सरकारचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. अशात विरोधकांना कळतं आहे,पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून विजय कोणाचाही झाला तरी
    ” मतदार जनता ” कायम करदाती राहणार आहे हे जनतेने जरूर घ्यावे!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *