
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई :बोरीवली पूर्वेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आसावरी पाटील यांच्या प्रवेशामुळे बोरीवली पूर्व परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Ohh jumping jack