BMC च्या FD वरून काँग्रेस v/s भाजप..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्ष चे सरकार आल्यापासून मागील १२ वर्षांत कोणतेही ठोस विधायक कार्य केले नसून, काँग्रेस सरकारने ७० वर्षांत उभी केलेली देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप मुंबई काँग्रेस ने केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 36 हजार 623 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्याची तरतूद करण्यात आल्याने या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून भाजप सरकार त्यावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे की, देशातील विमानतळ, बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग एक-एक करून विकण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. देशाची मालमत्ता विकून देश चालवला जात असून आता त्यांची नजर मुंबई महानगरपालिकेतील 81 हजार 449 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर पडल्याचा आरोप त्यांनी केला.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई दौऱ्यात ‘पैसा बँकेत पडून आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावेळीच या मुदत ठेवी मोडण्याचा डाव असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती आणि आता तीच शंका खरी ठरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. महानगरपालिकेच्या निधीबाबतचा हा वाद आगामी राजकीय वातावरण अधिक तापवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे


Share

2 thoughts on “BMC च्या FD वरून काँग्रेस v/s भाजप..

  1. ही फार धक्कादायक गोष्ट आहे खर काय आहे हे जनतेला समजलेच पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *