एसएमएस- प्रतिनिधी -सुरेश बोर्ले
मुंबई :आज सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली. स्थानकावर उपस्थित असलेले लोकल चालक, अभियंते, तांत्रिक विभाग तसेच इतर कर्मचारी फलाटावर झेंडे घेऊन उतरले आणि गाड्यांची वाहतूक थांबवली.
अचानक सुरू झालेल्या या संपामुळे कामावरून घरी परतणाऱ्या हजारो चाकरमान्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. संपूर्ण लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर एका अभियंत्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता. आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे संबंधित अभियंत्यावर झालेली कारवाई मागे घेण्यात यावी, अशी आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र यात झालेल्या गडबडीत लोकल वाहतूक ठप्प झाली आणि या गोंधळात लोकल ने काही लोकांना धडक दिली त्यात २ जणांचा मृत्यू झाला ही गंभीर बाब आहे!!
गंभीर