IIM प्रचंड फी वाढीमुळे गरिबांचचे MBA बनन्याचे स्वप्न कठीण- वर्षा गायकवाड

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मुंबई : उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. IIM अहमदाबाद सारख्या शैक्षणिक संस्थांमधून एमबीए करण्यापासून गरिब मुलांना वंचित रहावे लागत आहे. या संस्थेतील फी सर्वसामान्य समाजातील विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, त्यामुळे सरकारने त्यात लक्ष घालून परवडेल अशी शुल्क आकारणी करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे.

लोकसभेत नियम ३७७ नुसार प्रश्न उपस्थित करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, IIM अहमदाबाद या संस्थेत २००७ साली एमबीए साठी ४ लाख रुपये शुल्क होते, ते आज २७ लाख रुपये आहे, वर्षाचा इतर खर्च लक्षात घेता हा खर्च ३० लाखापर्यंत जातो. ही फी वाढ ५५७ टक्के आहे तर या काळातील महागाईचा दर १४६ टक्के आहे. २०१७ साली बनवलेल्या आयआयएम कायद्यानुसार या संस्थांना शुल्कवाढ करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे परंतु एवढा खर्च गोरगरिब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारा नाही, याचा सहानुभुती पूर्वक विचार करुन सरकारने हे शुल्क कमी करावे अथवा सवलत द्यावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


Share

One thought on “IIM प्रचंड फी वाढीमुळे गरिबांचचे MBA बनन्याचे स्वप्न कठीण- वर्षा गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *