एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
दिल्ली :जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) विद्यार्थी संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, लेफ्ट समर्थित विद्यार्थी संघटनांनी चौफेर विजय मिळवला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि महासचिव या केंद्रीय पॅनेलवरील सर्व चारही जागा डाव्या आघाडीने जिंकल्या आहेत.अध्यक्षपदी अदिती मिश्रा, उपाध्यक्षपदी कीझाकूट गोपिका बाबू, महासचिवपदी सुनील यादव आणि सचिवपदी दानिश यांनी विजय मिळवला आहे. मागील वर्षी एकच जागा जिंकणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) यंदा मोठा धक्का बसला असून, चारही पदांवर पराभव झाला आहे.
काँग्रेस समर्थित NSUI नेही निवडणुकीत सहभाग घेतला होता, मात्र त्यांना कोणत्याही पदावर लक्षणीय यश मिळाले नाही आणि मुख्य लढतीपासून ते दूर राहिले.
विजय करिता खुप खुप शुभेच्छा
Congrats
Great congrats