
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सचिव उमेश खानविलकर, सहसचिव निलेश भोसले, तसेच आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह नव्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भेटीदरम्यान ठाकरे यांनी सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई क्रिकेटला नवी दिशा देण्यासाठी संघटितपणे काम करा, असा संदेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Congratsall
क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांना खुप खुप शुभेच्छा
Congratulations
Good