प्रतिनिधी :मिलन शहा
मध्य प्रदेश; मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19वाहने डिझेलऐवजी पाणी भरल्याने प्रशासनात घबराट, पेट्रोल पंप सील
मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील रतलाम येथे आज होणाऱ्या ‘एमपी राईज 2025’ परिषदेला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी व्यवस्था केलेल्या वाहनांच्या ताफ्यात डिझेलऐवजी पाणी भरल्याचा भयानक प्रकार समोर आला.
गुरुवारी रात्री ताफ्यातील सुमारे 19 वाहने धोसी गावाजवळील भारत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेली व तेथे डिझेल भरल्यानंतर, काही अंतर पुढे गेल्यानंतर सर्व वाहने अचानक बंद पडल्या. त्यावेळेस चेक केल्यावर डिझेल एवजी पाणी भरल्याचे प्रकार उघडकीस आले.
Ohh