NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल कोलंबियात…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

नॅशनल  फिश वर्कर्स  फोरम  (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना कोलंबिया सरकारकडून आंतरराष्ट्रीय परिषदेचे अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे.

एनएफएफ चे अध्यक्ष तसेच वर्ल्ड  फोरम  ऑफ  फिशर  पीपल्स  (WFFP) चे सदस्य म्हणून त्यांना कोलंबिया सरकारच्या वतीने आयोजित “सोशल संमिट ऑफ द पीपल्स   या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 20 ते 22 फेब्रुवारी  दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

तसेच 24 ते 28 फेब्रुवारी  या कालावधीत कोलंबियातील कार्टीजना (cartegena )

 शहरात आंतरराष्ट्रीय कृषी सुधारणा व ग्रामीण विकास परिषद –( CIRARD+20) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची संकल्पना आहे — “कामासाठी जमीन, अन्नासाठी जमीन, जगण्यासाठी जमीन.”

ही परिषद कोलंबिया सरकारद्वारे, ब्राझील च्या संघीय प्रजासत्ताकाच्या सहकार्याने आणि फूड  अँड  ऍग्रिकलचर  ऑरगॅनिझाशन  (FAO) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. 2006 साली पोर्तो अलेग्रे येथे स्वीकृत करण्यात आलेल्या बांधिलकीला नव्याने दृढ करण्याचा, तसेच समतोल जमीन वाटप, शाश्वत ग्रामीण विकास, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण भागातील सामाजिक समावेशन या मुद्द्यांवर ठोस अजेंडा पुढे नेण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.

निमंत्रण पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या कार्यक्रमांमधील सहभाग ग्रामीण भागासाठी अधिक न्याय्य आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सोशल संमिट ऑफ द पीपल्स आणि सिरार्ड +20 (CIRARD+20 )या परिषदांमध्ये संघटित नागरी समाजाच्या भूमिकेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, सामायिक करारांची मांडणी व संवाद प्रक्रिया अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

कोलंबिया सरकारने जगभरातील शेतकरी संघटना, लघु अन्न उत्पादक, आदिवासी समुदाय, आफ्रो-वंशज समाज, महिला, युवक, पारंपरिक मच्छिमार, पशुपालक तसेच अन्न सार्वभौमत्व, कृषी आणि पर्यावरण न्यायाशी संबंधित सामाजिक चळवळींच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.


Share

One thought on “NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल कोलंबियात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *