RTE अंतर्गत17फेब्रुवारी प्रक्रिया सुरु ,10 मार्च पर्यंत मुदत.

Share

एसएमएस- प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पालकांना १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अर्ज भरता येणार असून, ही सुविधा https://student.maharashtra.gov.in/adm_portal� या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संदर्भातील सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्याची माहिती शरद गोसावी, शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिली.
२५ टक्के आरक्षणांतर्गत प्रवेश
आरटीई अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावर २५ टक्के जागा दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी राखीव असतात. या प्रवेशाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
वंचित घटकांमध्ये समावेश :
अनुसूचित जाती (एससी)
अनुसूचित जमाती (एसटी)
विमुक्त जाती (अ)
भटक्या जमाती (ब), (क), (ड)
इतर मागासवर्ग (ओबीसी)
विशेष मागासवर्ग (एसबीसी)
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक
एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके
अनाथ, दिव्यांग अथवा कोविड प्रभावित बालके
आर्थिक दुर्बल गट (EWS) :
ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबांतील बालकांचा समावेश आर्थिक दुर्बल गटात होतो.
शाळांची निवड करताना दक्षता आवश्यक
आरटीई पोर्टलवर पालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या हवाई अंतरातील शाळांची यादी उपलब्ध होईल. पालकांनी विचारपूर्वक जास्तीत जास्त १० शाळांची निवड करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे, अचूक माहिती नमूद करणे आणि निर्धारित मुदतीत संपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास आरटीई पोर्टलवरील मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Share

One thought on “RTE अंतर्गत17फेब्रुवारी प्रक्रिया सुरु ,10 मार्च पर्यंत मुदत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *