एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई :SGNP परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननाच्या विरोधात मंगळवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे तहसील कार्यालयासमोर ठाणे शहर काँग्रेस च्या वतीने धरने प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या आंदोलनात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर तसेच संबंधितांना परवानगी देणाऱ्या आणि उत्खननास मदत केल्याचा आरोप असलेल्या ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
ठाणे शहर काँग्रेस च्या वतीने सर्व पदाधिकारी, प्रदेश सदस्य, सेल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच महिला काँग्रेस कार्यकर्त्यां तसेच सामान्य पर्यावरण प्रेमी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन ज्युपिटर रुग्णालयाच्या शेजारील तहसील कार्यालयासमोर होणार आहे.
ऍड. विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Goodmove