प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
क्रिकेट : सध्या आशिया कप २०२५चा थरार आखाती देशात सुरू आहे.आशियातील अनेक मातब्बर संघ येथे एकमेकांशी भिडत आहेत.तर काल ह्या स्पर्धेतील प्रमुख प्रतिस्पर्धी व संभावित विजेते आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी!भारत+पाक ह्या दोन्ही संघात काल दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना रंगला.त्यामध्ये भारताने बाजी मारली.प्रथम पाक कर्णधाराने नाणेफेक जिंकत,प्रथम फलंदाजी स्वीकारली.पण भारतीय गोलंदाजांनी आपली चोख कामगिरी पार पाडत पाकला १२७ धावत रोखले.नंतर फलंदाजी करताना १५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात,हा सामना आरामात आपल्या खिशात घातला.सर्व भारतीयांकडून ह्या विजयाचं स्वागत होत आहे.तर पुढील वाटचालीसाठी,आपल्या तमाम भारतीयांकडून भारतीय संघास हार्दिक शुभेच्छा!
GreatTeamIndia
Congratulations Team India