T-20 क्रिकेटला रोहित, विराट आणि रवींद्र जडेजाचा बाय बाय….

Share

File photo
प्रतिनिधी:सुरेश बोरले

निवृत्तीची वेळी सगळ्यांवर येते.आपण ज्या ठिकाणी सेवेला असतो, त्याआस्थापनातून कर्मचारी व कामगार वयाच्या 60व्यां वर्षी निवरुत्त होतो.पण क्रीडा सेवेला हा अपवाद आहे.कारण जस जसे खेळाडूचे वय वाढते,तशी त्याची शरीर क्षमता,लवचिकपणा,दम खम यावरती,नियंत्रण येते.त्याला समजते की !आता आपण थांबलेले बरे.हाच योग्य निर्णय असतो.त्याला आपण खेळाच्या शिखरावरती असताना निवृत्ती घ्यावी असे वाटते.हे बरोबर आहे.तेच “सर”सुनील गावसकर “भारत रत्न”सचिन तेंडुलकर व इतर मैदान गाजवलेल्या क्रिडावनतांनी केलेल आहे.कारण क्रीडा प्रेमींनी आपल्याला नेहमीच लक्षात ठेवावे !अशी त्यांची भावना असते.ते बरोबर आहे.तीच कृती आता कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ने केली आहे .जडेजा हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू संघाचा आधार होता.त्याने54 बळी घेतले असून उत्तम क्षेत्ररक्षक ही आहे. त्याने 515 धावाही ठोकल्यात. हे सगळे क्रिकेटच्या उच्च शिखरावर आहेत.पाय उतार होताना हळू हळू व्हायचे असते.आधी T -20 मग एक दिवसीय सामने शेवटी कसोटी.असा हा उलट क्रम असतो.रोहितने एकंदरीत 159 सामने खेळले व 4231 धावा त्याने कुटलेल्या आहेत.त्यामधे 5शतकेही आहेत.हा एक विक्रम आहे.तर २००७ सली झालेल्या पहिल्याटी-T -20 वीश्र्वकपाचा तो साक्षीदार आहे.2007 ते 2024 असा मोठा पल्ला त्याने गाठलेला आहे.तर विराटने 125सामनयांत 4188 धावांचा डोंगर उभा केलेला आहे,त्यामधे एक शतकही आहे.हे तिघेही T-20 विश्वकप 2024 चे अजिंक्य साक्षीदार असून, ते खेळाच्या उच्च शिखरावरती आहेत.पण अलविदा करण्याची, हीच योग्य वेळ आहे.आपल्या शेवटच्या भाषणात विराटने पुढच्या यशवंत पिढीने आता हा डोलारा सांभाळायचा आहे,जसा आम्ही सांभाळला!ही भावना व्यक्त केली. तशीच भावना रोहितचही आणि जडेजाची ही आहे.हे विधान भावनिक आहे! पण योग्य आहे.आम्हालाही वाटत!त्यांनी निवृत्त होऊ नये,पण शेवटी ते ही मानवच आहेत.त्यांना थांबावच लागेल?तीघांनाही येणाऱ्या काळासाठी जगातील क्रिकेट प्रेमिंकडून,लाख लाख हार्दिक शुभेच्या!


Share

One thought on “T-20 क्रिकेटला रोहित, विराट आणि रवींद्र जडेजाचा बाय बाय….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *