UPपोलिसांच्या ‘हाफ एनकाऊंटर’ पद्धतीवर HC चे ताशेरे..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

प्रयागराज : उत्तर प्रदेश पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या तथाकथित ‘हाफ एनकाऊंटर’ पद्धतीवर इलाहाबाद हायकोर्टने तीव्र नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत फटकारले आहे. केवळ बढती मिळवण्यासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहवा मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही पोलीस अधिकारी विनाकारण शस्त्रांचा वापर करत असल्याची गंभीर टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
हायकोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की, अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना मुद्दाम गुडघ्याखाली गोळी मारण्याची पद्धत अवलंबली जात आहे. ही कृती कायद्याच्या चौकटीबाहेर असून ती अत्यंत चिंताजनक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
“आरोपी दोषी आहे की नाही आणि त्याला कोणती शिक्षा द्यायची, हा अधिकार केवळ न्यायपालिकेकडे आहे. पोलिसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही,” असे ठणकावून सांगत हायकोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या निरीक्षणामुळे यूपी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली होणाऱ्या अशा कारवायांवर अंकुश लावण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली आहे.


Share

One thought on “UPपोलिसांच्या ‘हाफ एनकाऊंटर’ पद्धतीवर HC चे ताशेरे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *