
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
नेपाळमधील पोखरा येथे ८ ते ११ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई थाय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रातील मुंबईच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेत खेळाडूंनी एकूण ५ पदके पटकावत मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत पार्थ राणे आणि रुद्र तुनकर यांनी सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला, तर रुद्र पांडे, कायरा यादव आणि महेंद शर्मा यांनी रौप्यपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.
पदक विजेते खेळाडू :पार्थ राणे — सुवर्ण पदक,
रुद्र तुनकर — सुवर्ण पदक, रुद्र पांडे — रौप्य पदक,कायरा यादव — रौप्य पदक,महेंद शर्मा — रौप्य पदक
या यशाबद्दल सर्व खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक गौरव अशोक पांचाळ , शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, पालक तसेच स्पॉन्सर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Congrats
Congratulations