एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड येथील कुरार पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. एका गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी व कठोर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. संबंधित प्रकरणात अटक टाळण्यासाठी किंवा गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कथितरित्या १ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत थेट एसीबीकडे धाव घेतली.
एसीबीने सापळा रचून लाचेचा व्यवहार सुरू असतानाच छापा टाकला आणि दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान पोलीस ठाण्यातील केबिनची झडती घेतली असता ६.३४ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत समाधानकारक खुलासा करता आला नसल्याने आणखी अवैध वसुलीचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणामुळे कुरार पोलीस ठाण्याची प्रतिमा मलिन झाली असून पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित दोघांना न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास एसीबीकडून सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस ठाण्यातच लाचलुचपत होत असल्याचे उघड झाल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निसर्गाचा नियम आहे करावे तसे भरावे
ह
ACBgreat work catching the main कलपत8L