एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
नगरसेविका लक्ष्मी भाटिया-फाळके आणि तेलंगणा प्रजा संघम यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई : तेलंगणा राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला ‘बाथुकम्मा उत्सव २०२६’ हा पारंपरिक फुलांचा उत्सव रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथील गणेश घाटावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे उपनेते व युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या प्रेरणेने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ५६ च्या नगरसेविका लक्ष्मी नितीन भाटिया-फाळके आणि तेलंगणा प्रजा संघम, गोरेगाव पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
बाथुकम्मा हा फुलांच्या सजावटीतून निसर्ग, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा तेलंगणातील पारंपरिक सण आहे. या उत्सवाच्या माध्यमातून गोरेगाव परिसरातील नागरिकांना तेलंगणाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अमोल कीर्तिकर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. उत्सवात सर्व नागरिकांनी, तसेच वरिष्ठ पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आयोजक सौ. लक्ष्मी नितीन भाटिया-फाळके, नगरसेविका, प्रभाग क्रमांक ५६ व स्थायी समिती सदस्य.यांनी जास्तीतजास्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तेलंगणाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनुभव घेण्याची संधीचा लाभ घेवुन आपल्या जिवनात उतरावा