
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.
मुंबई :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पक्षप्रमुखांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करत आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे काम करण्याचे आवाहन केले. पुण्यात शिवसेनेचा झेंडा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Allthebest