RSS ने गांधी विचार व संविधान स्वीकारावे-काँग्रेस.

Share

एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकपूर्तीच्या निमित्ताने महात्मा गांधींच्या पुतळ्यास वंदन केले, ही उशिरा आलेली जाणीव आहे. गांधी विचारांबरोबरच आता देशाचे संविधानही संघाने स्वीकारावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली.
संघाच्या कार्यक्रमात सलमान खान, अदनान सामी यांसारख्या सिनेताऱ्यांना बोलावण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवायचा आणि दुसरीकडे लोकप्रिय व श्रीमंत मुस्लिमांना जवळ करायचे, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरसंघचालक कोणत्याही समाजाचा असू शकतो, असे सांगितले जाते; मात्र आजवर एकही महिला, दलित, आदिवासी वा मुस्लिम सरसंघचालक का झाला नाही, असा सवालही राजहंस यांनी उपस्थित केला. संघाच्या कथनी आणि करनीत फरक असल्याचे ते म्हणाले.


Share

2 thoughts on “RSS ने गांधी विचार व संविधान स्वीकारावे-काँग्रेस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *