बातमीचा दणका रस्ता समतोल करण्याचे काम सुरु…

Share

Photo :बातमी प्रसिद्ध झाल्यावर पालिकेने काम सुरु केले.

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : दहिसर पूर्वेतील आनंद नगर येथील उड्डाणपुलावर सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असताना, रस्त्याची अनियमित उंची आणि त्यावर टाकलेल्या डांबरखडीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली  होती मात्र या बाबत sms न्यूज पोर्टल ला बातमी प्रसिद्ध झाल्यावर पालिका जागी झाली व रस्ता समतोल करण्याचे काम सुरु केले आहे..

दहिसर आनंद नगर आविष्कार बिल्डिंगजवळील या कॉर्नरवर गेल्या तीन वर्षांपासून पुलावरील काँक्रीट रस्त्यावर अनावश्यक डांबरखडी टाकण्यात आल्याने रस्त्याची सपाटी उंचावली असून तो अनलेव्हल झाला आहे. परिणामी, येथून जाणाऱ्या डंपर, टँकर, काँक्रीट मिक्सर, टेम्पो आदी जड वाहनांमुळे मोठा आवाज निर्माण होत असून आसपासच्या सोसायट्यांतील रहिवाशांना अहोरात्र ध्वनीप्रदूषणाचा सामना करावा लागत होता .

विशेषतः रात्रीच्या वेळी हा त्रास अधिक जाणवत असून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत होते . सध्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांनी तक्रार केली होती.

या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडया यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन प्रश्न उपस्थित केला होती  की, काँक्रीट रस्त्यावर डांबरखडी टाकण्यामागील कारण काय? तसेच, रस्त्याची योग्य समातोल  साधण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे काम करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.या समस्ये बाबत पालिकेच्या पूल विभागाचे सहाय्यक अभियंता सचिन सोने यांना मोबाईल वर संपर्क करून ही  त्यांनी उत्तर दिले नाही तसेच व्हाट्स अँप मेसेज चा ही  उत्तर मिळाला नव्हता. मात्र sms न्यूज ला बातमी प्रसिद्ध झाल्याने  पालिका सरसावली व रस्ता समतोल करण्याचे काम सुरु केले आहे.

SMSन्यूज मध्ये बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या काही दिवसात  दहिसर आनंद नगर उड्डाण पुला खालील  रस्त्याचे समतोल करण्याचे कार्य पालिकेने सुरु केल्याने आम्ही https://www.smsamachar.com/sms/  न्यूज चे आभारी आहोत  – राजेश पंड्या -सामाजिक कार्यकर्ते


Share

One thought on “बातमीचा दणका रस्ता समतोल करण्याचे काम सुरु…

  1. खुप छान बातमी छापुन काम केले आहे येथिल नागरिक खुप हाल सोसत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *