मालती माने विद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

इचलकरंजी: खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघ, क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे सर्वसाधारण विजेतेपद शिक्षणाधिकारी बी एम कासार यांच्या हस्ते मालती माने विद्यालय इचलकरंजी या आमचे विद्यालयास प्रदान करण्यात आले. यासाठी विजेते विद्यार्थी, सहभागी विद्यार्थी व पालक आणि या सर्वांवर अपार मेहनत घेणाऱ्या क्रीडा प्रमुख सुनिल कोकणी आणि सहकारी शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन!

सन २०२४-२५ नंतर याही वर्षी सलग विजेतेपद टिकवण्याचा एक मोठा आनंद आहेच! २० शाळांमधील हजारभर विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धांमध्ये खाजगी प्राथमिक शाळांचे शिक्षक, कर्मचारी शालेय वेळेव्यतिरिक्त अधिक काम करत सकाळी सत्रात स्पर्धा आणि परत शालेय वेळेत शाळा यामुळे हा एक सुंदर वस्तुपाठ घातल्याचा आनंदही आमचे सोबत आहे.


Share

One thought on “मालती माने विद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *