मालवणी अंबोजवाडीतील शौचालय दुरवस्थेत.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मालाड, ता. २२ (बातमीदार) – मालाड पश्चिमेतील मालवणी अंबोजवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मागील चार वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

अंबोजवाडीतील साई दर्शन सोसायटीलगत महिला व पुरुषांसाठी दहा शौचकुप असलेले हे शौचालय २०१६-१७ मध्ये रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून उभारण्यात आले होते. त्यावेळचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या एका वर्षातच या शौचालयाची दुरवस्था सुरू झाली.

सध्या शौचालयात वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे, दारे तुटलेली आहेत, भिंतींचे प्लास्टर निखळले आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून, नियमित देखभाल न झाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

शौचालयातील सांडपाण्याची टाकी भरून वाहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रहिवाशांना मच्छरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर रात्रीच्या वेळी ही समस्या अधिकच तीव्र होते.

या संदर्भात स्थानिकांनी पालिका पी उत्तर विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय, परिसरातील सार्वजनिक गटारांचीही दुरवस्था झाली असून, नियमित साफसफाई न झाल्याने गटारे तुंबून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासन या वस्तींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

चार वर्षांपासून सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था असून, वारंवार तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्ष कायम आहे. तुंबलेल्या गटारांमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आम्हाला शौचालय असून ही उपयोग करता येत नाही. तसेच आमची गैरसोय होत आहे. मात्र पालिका प्रशासन या कडे दुर्लक्ष का करतय कळत नाही.-प्रमिला सोनी रहिवासी.

रात्रीच्या व अत्यावश्यक वेळी आमच्या  घरा लगत शौचालय असून ही आम्हाला दुसरी कडे जाने भाग पडत आहे. आहाया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका असून ही साधं शौचालयची निट देखभाल का चंपा राजभर -रहिवासी महिला.


Share

2 thoughts on “मालवणी अंबोजवाडीतील शौचालय दुरवस्थेत.

  1. या सर्व घटनेला जवाबदार फक्त प्रशासन आहे असे नाही याला जनता हि तेवढिच आहे साफ सफ़ाई ठेवले पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *