
मालाड पश्चिमेत डॉ. ओंकार पोवार यांच्या ‘एंडोकेअर क्लिनिक’चे उद्घाटन..
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
नगरसेवक विक्रम राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरात डॉ. ओंकार पोवार यांच्या ‘एंडोकेअर क्लिनिक’चा उद्घाटन सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ५० चे नगरसेवक विक्रम राजपूत राहणार आहेत.
अहिंसा मार्गावरील आदित्य अहिंसा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील दुकान क्रमांक ४ येथे हे क्लिनिक सुरू करण्यात येत आहे. उद्घाटन सोहळा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त डॉ. राजाराम पोवार, डॉ. रंजना पोवार, डॉ. ओंकार पोवार आणि डॉ. श्रेयल पोवार यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
संपर्क : ७७७७०७०११५
डॉ. राजाराम पोवार, साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा