मालाड मध्ये पदपथावर दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई.

Share

एसएमएस-प्रतिनिधी-सोमा बाबू डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील ओर्लेम  आणि मीठ चौकी  परिसरातील पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.दुचाकीस्वारांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या होत्या. सिग्नल टाळण्यासाठी किंवा झटपट मार्ग काढण्यासाठी अनेक जण पदपथावरून दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. काही प्रसंगी अपघातही घडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मालाड पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची दखल घेत मालाड पोलिसांनी पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केल्याने स्थानिक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत या ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.


Share

One thought on “मालाड मध्ये पदपथावर दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *