शिकलगार समाजाचे२६मार्च ला राज्यस्तरीय अधिवेशन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

लेंगरे :अखिल महाराष्ट्र पीर कलंदर शिकलगार समाजसेवा संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन २६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता लेंगरे (ता. खानापूर) येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात ‘आदर्श माता-पिता’ तसेच ‘आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही तेच असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रभरातील शिकलगार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी-बारावी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना म. गुलाब सय्यद शिकलगार यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
यंदाचे ‘आदर्श माता-पिता’ पुरस्कार ताजमा इलाही शिकलगार व इलाही चांद शिकलगार (कुंडल), सुलताना दिलावर शिकलगार व दिलावर भिकू शिकलगार (नेर, ता. खटाव), शबाना इलाही शिकलगार व इलाही उंबर शिकलगार (पारे, ता. खानापूर), लैलाबी शब्बीर शिकलगार व अॅड. शब्बीर हाजी इस्माईल शिकलगार (सातारा), शाजन महमद शिकलगार व म. महमद रसूल शिकलगार, तसेच फिरदोश रियाज शिकलगार व रियाज अब्दुलगणी शिकलगार (कोरेगाव) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
तसेच ‘आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार अजीज इब्राहिम शिकलगार (लेंगरे) व दिलावर दादू शिकलगार (पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे.
अधिवेशनादरम्यान विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *