स्वर सागरिका म्युझिक सर्कल मुंबई प्रस्तुत हेमंत कुमार हिट्स..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले

lमुंबई : हेमंत कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा देणारी खास मैफिल स्वर सागरिका म्युझिक सर्कल मुंबई तर्फे विलेपार्ले येथील साठे महाविद्यालय येथे रंगली.
मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांच्या गीतांचे कार्यक्रम वारंवार होत असताना, हेमंत कुमार यांच्या लोकप्रिय गाण्यांची मैफिल आयोजित करून संगीत रसिकांसाठी एक वेगळा आनंददायी अनुभव सादर करण्यात आला.
या कार्यक्रमात एकूण १० गायकांनी हेमंत कुमार यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण केले. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण सभागृह संगीताच्या सुरांनी भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. सुभाशीनी स्वार यांनी केले होते. तर संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीमती थरिसा डिसोझा यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिबा यांनी प्रभावीपणे केले.
एकंदरीत, जुन्या सुवर्णकाळातील गीतांची आठवण करून देणारी ही मैफिल संगीतप्रेमींसाठी संस्मरणीय ठरली.


Share

2 thoughts on “स्वर सागरिका म्युझिक सर्कल मुंबई प्रस्तुत हेमंत कुमार हिट्स..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *