कुर्ला-ट्रॉम्बे झोपड्या न पाडण्याची मागणी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : कुर्ला–ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगत असलेल्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने दिल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान ही कारवाई प्रस्तावित आहे.
ही पाडकाम मोहीम तात्काळ रद्द करून बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना राबवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे. केवळ सहा दिवसांची सूचना देऊन हजारो कुटुंबांना बेघर करणे अमानवी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


Share

One thought on “कुर्ला-ट्रॉम्बे झोपड्या न पाडण्याची मागणी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *