
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबईच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या दादर पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला.महेश सावंत यांच्या प्रयत्नातून हे सुशोभीकरण होत आहे.
या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीफळ वाढवून कामाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत , उपनेते मिलिंद वैध , शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मुंबईतील अनेक ऐतिहासिक राजकीय सभांचे आणि क्रीडा स्पर्धांचे साक्षीदार राहिले आहे. सुशोभीकरणामुळे या ऐतिहासिक मैदानाचे वैभव अधिक वाढणार असून नागरिकांसाठीही सुविधा सुधारण्यात येणार आहेत.
Great