
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :शिकालगार सहकारी पतपेढी च्या कुर्ला येथील कार्यालयात सिव्हिल डिफेन्सच्या कमांडंट राजेश्वरी कोरी मॅडम आणि भारत सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट विभागाचे सहाय्यक संचालक अनिल शेवाळे यांनी भेट घेऊन शिकलगार जमातीच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत शिकलगार जमातीच्या शैक्षणिक आणि कौशल्यविकासाच्या गरजांवर विशेष भर देण्यात आला. आगामी काळात जमातीतील मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
या चर्चेत जमातीचे अध्यक्ष नौशाद शिकलगार, अय्युब शिकलगार, फैय्याज शिकलगार आणि गणी शिकलगार यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी जमातीसमोरील विविध अडचणी मांडून कौशल्यविकास उपक्रम राबविण्याची गरज अधोरेखित केली.
या उपक्रमामुळे शिकलगार समाजातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.