महिलांचे व्हिडीओ सार्वजनिक होणे अत्यंत गंभीर-वर्षा गायकवाड

Share

एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. राज्यात आधीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नü गंभीर आहे. अशोक खरात प्रकरणात स्थानिक पोलीसांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सार्वजनिक होणे आक्षेपार्ह असून VDO सार्वजिन करणाऱ्यांवर पोलीस वा सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अशोक खरातने अंधश्रद्धेचा बाजार मांडून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु होता पण त्याची भनक स्थानिक पोलिसांना कशी लागली नाही, राज्याच्या गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. हे प्रकरण बाहेस काढल्याचा मुख्यमंत्री आता मोठा दावा करत असले तरी एवढे वर्ष ते काय करत होते. त्यांच्या गृहविभागाला याची काहीच माहिती कशी नव्हती, या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावा लागतील. या प्रकरणात फक्त महिलांच्या लैंगिक शोषणाचाच प्रकार नसून त्यात अनेक राजकीय नेते व मंत्री यांचे खरातशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. सरकार त्यांची चौकशी का करत नाही. देवेंद्र फडणवीस हे स्वतःची खूर्ची वाचवण्यासाठी आपल्या पक्षातील व मित्रपक्षातील खरातशी संबंधित मंत्री व नेत्यांची चौकशी करत नाहीत का, असेही खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अशोक खरातशी कोणते मंत्री व नेते किती वेळ बोलले याचा सीडीआर बाहेर आला आहे. हा सीडीआर खाजगी व्यक्तीला कसा काय मिळाला व त्यातील काही लोकांचीच नावे कशी काय जाहीर केली, यामागे राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार दिसत आहे. सीडीआर बाहेर कसा आला त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, उपाध्यक्ष अखिलेश यादव, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, राजपती यादव, नगरसेविका अजंता यादव, अर्शद आझमी इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.

एसआयआरविषयी मुंबई काँग्रेसची बैठक..
निवडणूक आयोगाकडून विशेष पुनरीक्षण मोहिम (SIR) सुरु करण्यात येणार आहे. याविषयी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे पार पडली. एसआयआर बद्दल यावेळी चर्चा करण्यात आली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *